Posts

माझा नविन अभंग क्र.127

 अभंग 127 श्रद्धा वाढे अविवेका, तर्क ज्ञानाचा आवाका  नतमस्तक पावका, विज्ञानयुगी ॥ धृ ॥ यश अर्थ वृध्दी साठी, घेऊनी अज्ञान काठी  धावतो मृतात्म्या पाठी, संसारात ।। 1।। भौतिक सूखे गुंतला, नीजस्वार्थ बोकाळला  स्वदेव वर्म विसरला, राजे म्हणे ॥ 21 कवी गायक संगीत श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले (राजे) Nojoto

Let's decide

...Many people India' don't know about real though of Buddha. Some follow Buddha's telisman,some follow only name of religion, some pretend to follow Budha We need to feciate them properly We all need read properly Buddha and Dhamm..

खंत

खंत वाटते मला, कवितेत अजूनही फाटक्या लुगड्यातली आई आहे, शामची आई केव्हाच मावळली भावनेच्या गाभाऱ्या तून, आजची आई भ्रमण ध्वनी वर चॅटिंग करणारी शामची ममी आहे बनियल ला भोक पडलेला दाढी वाढवणारा बाप अजुन आधुनिक भारतात कोठे सापडतो हे एक इंगित आहे माझा देश विकसनशील देश आहे मला मान्य की रोजची भुक काहींचे ममीपापा रेशन च्या फेकलेल्या तुकड्यावर शमवतात कारण आळस, महागाई, बेरोजगार, अर्धवट शिक्षण अंधश्रध्दा, अंधभक्ती, दररोज नवा दिवस तडजोडीने स्टेटस् वर ठेवून क्षणिक आनंदाने, कधी श्रध्दांजली ने साजरा करतो. भ्रमणध्वनी आता जवळचा मित्र बनलाय लहान पोराच्या हातातलं खेळणं काढून घेतलं की जसे वागते तसा तो बनला आहे, सर्व देशात घरटी भ्रमण ध्वनी पोहचला आहे. देशाचे भवितव्य उद्या हे कसे उज्ज्वल करतील माहीत नाही कारण हा आधुनिक समाज अजूनही गुंगीत आहे. Rajendrakumar Jagannath Bhosale

एक विचार

माझेच विचार बरोबर अशी काहींची गोड धारणा असते, तर काही तत्वज्ञानाच्या भोवऱ्यात अडकलेले असतात. मोठ्या माणसांची नावे घेऊन त्यांचा आदर्श जपण्याचे ढोंग करतात, स्वतः कोरडे पाषाण, दुसऱ्याचे विचार स्व- निर्मिती चा आविर्भाव खूप छान करतात .असे पोपट  गल्लोगल्ली अर्धवटांच्या  भ्रष्ट मांदियाळीत टेंभा मिरवताना दिसतात. विचाराने स्व-प्रकाशमान झालेल्यावर कितीही ढगाळ, दूषित, पूर्वग्रहीत टीकाटिप्पणी प्रज्ञा सूर्याला फार काळ झाकून ठेवू शकत नाहीत,Every dogs its days.

right of vote

Image