खंत
खंत वाटते मला, कवितेत अजूनही फाटक्या लुगड्यातली आई आहे, शामची आई केव्हाच मावळली भावनेच्या गाभाऱ्या तून, आजची आई भ्रमण ध्वनी वर चॅटिंग करणारी शामची ममी आहे
बनियल ला भोक पडलेला दाढी वाढवणारा बाप अजुन आधुनिक भारतात कोठे सापडतो हे एक इंगित आहे माझा देश विकसनशील देश आहे
मला मान्य की रोजची भुक काहींचे ममीपापा रेशन च्या फेकलेल्या तुकड्यावर शमवतात कारण आळस, महागाई, बेरोजगार, अर्धवट शिक्षण अंधश्रध्दा, अंधभक्ती, दररोज नवा दिवस तडजोडीने स्टेटस् वर ठेवून क्षणिक आनंदाने, कधी श्रध्दांजली ने साजरा करतो. भ्रमणध्वनी आता जवळचा मित्र बनलाय लहान पोराच्या हातातलं खेळणं काढून घेतलं की जसे वागते तसा तो बनला आहे, सर्व देशात घरटी भ्रमण ध्वनी पोहचला आहे.
देशाचे भवितव्य उद्या हे कसे उज्ज्वल करतील माहीत
नाही
कारण हा आधुनिक समाज अजूनही गुंगीत आहे.
Rajendrakumar Jagannath Bhosale