एक विचार
माझेच विचार बरोबर अशी काहींची गोड धारणा असते, तर काही तत्वज्ञानाच्या भोवऱ्यात अडकलेले असतात. मोठ्या माणसांची नावे घेऊन त्यांचा आदर्श जपण्याचे ढोंग करतात, स्वतः कोरडे पाषाण, दुसऱ्याचे विचार स्व- निर्मिती चा आविर्भाव खूप छान करतात .असे पोपट गल्लोगल्ली अर्धवटांच्या भ्रष्ट मांदियाळीत टेंभा मिरवताना दिसतात. विचाराने स्व-प्रकाशमान झालेल्यावर कितीही ढगाळ, दूषित, पूर्वग्रहीत टीकाटिप्पणी प्रज्ञा सूर्याला फार काळ झाकून ठेवू शकत नाहीत,Every dogs its days.